वेले येथील अनाथाश्रमासह वृद्धाश्रमात आरोग्य तपासणी शिबीर

WhatsApp Image 2019 07 12 at 19.50.44

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील वेले येथे अमर संस्था संचलित बालगृह, अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमात चोपडा येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले.

यशोधन चॅरिटेबल ट्रस्ट चोपडा येथील यशोधन चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मागील 11 वर्षापासून सातत्त्याने वेले येथील बालक, अनाथाश्रम, वृद्धाश्रम येथे आरोग्य शिबिर व अन्नदानाचे महान कार्य करत आहे. यावर्षी देखील वेले येथील अमर संस्था संचलित बालगृह अनाथाश्रम वृद्धाश्रम येथे मागील 11 वर्षापासून दरवर्षी 11 जुलै रोजी आरोग्य शिबिर, दंत व नेत्र तपासणी शिबीर, मोफत औषध वाटप व अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला.

याप्रसंगी यशोधन चैरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.राहुल पाटील, संचालिका डॉ. तृप्ती पाटील, उपाध्यक्ष रामदास पाटील, संचालक व्ही.के.पाटील यांच्या सत्कार अमर संस्थाचे अधीक्षक निलेश चौधरी यांनी केला. डॉ राहुल पाटील यांनी वृद्धाश्रम, बालगृह व अनाथाश्रमातील सुमारे 400 विद्यार्थ्यांची दंत व मुखरोग तपासणी केली. त्याच प्रमाणे डॉ. तृप्ती पाटील यांनी विद्यार्थ्यांची सर्वांगीण व नेत्र तपासणी केली.

आरोग्याविषयी केले मार्गदर्शन
डॉ राहुल पाटील यांनी दांत व दातांचे आजार व त्यावर घ्यवयाची काळजी यावर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे बदलत्या जीवनशैलीत विविध आजार आपण कसे टाळू शकतो, याविषयी माहिती दिली. सर्व विद्यार्थ्यांना मोफत टूथपेस्ट, टूथब्रश आणि औषधी वाटप व अन्नदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शेषराव पाटील यांनी केले व यशस्वीतेसाठी प्रविण माळी, आत्माराम रायसिंग जितेंद्र चौधरी, शैलेश चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content