कुसुंब्यातून तरूणाच्या दुचाकीची चोरी; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

 

 

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कुसुंबा येथे घरासमोर पार्किगला लावलेली २० हजार रूपये किंमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीला आली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिपक नाना पाटील (वय-२७) रा. कुसुंबा ता. जि.जळगाव हे खासगी काम करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे (एमएच १९ बीएक्स १३०८) दुचाकी आहे. १८ मार्च रोजी रात्री १० वाजता त्यांनी दुचाकी आपल्या घरासमोर लावली होती. दुसऱ्या दिवशी १९ मार्च रोजी सकाळी दुचाकी आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध केली असता मिळून न आल्याने १५ दिवसानंतर ३ एप्रिल रोजी सायंकाळी दिपक पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संतोष पवार करीत आहे.

Protected Content