पोलीस ठाण्यात गोंधळ : तिघांविरूध्द गुन्हा

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील पोलीस स्थानकात गोंधळ घालणार्‍या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथे कार्यरत असणारे कर्मचारी संदीप वानखेडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात नमूद केले आहे की, सुनील सरदारसिंग राजपूत याने ठाणे अंमलदार कक्षात येऊन गोंधळ घातला. त्याने अश्लील शिवीगाळ करत, शो-रुमवाले माझ्या मुलाला मारहाण करून निघून गेले. तुम्ही त्या शोरूमवाल्यांची तक्रार का घेता? अशी विचारणा करत धुडगुस घातला.

यानंतर अक्षय सुनील राजपूत व शैला सुनील राजपूत यांनी देखील पोलिस ठाण्यात आपल्याला शिविगाळ केल्याचे या फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी संदीप वानखेडे यांच्या फिर्यादीवरून सुनील राजपूत, अक्षय राजपूत व शैला राजपूत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

Protected Content