बोदवड प्रतिनिधी । येथे काँग्रेस पक्षातर्फे काळे कायदे रद्द करण्यात यावे यासाठी पक्षाच्या वतीने करण्यात आलेल्या व्हर्च्युअल आंदोलनात सहभाग घेण्यात आला.
बोदवड तालुका आणि शहर काँग्रेस कमिटी तर्फे शेतकरी विरोधी काळे कायदे केल्याबद्दल तसेच कामगार विरोधी काळे कायदे, रेल्वेचे खाजगीकरणं थांबवावे आणी गरीबांना रोजगार मिळावा यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसुल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व मंत्री मंडळातील अनेक मंत्र्यांनी टि.व्ही.स्क्रिनवर महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर,व काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना भाजपा सरकारने केलेल्या संविधान विरोधी काळ्या कामाची माहिती देण्यात आली.
या आंदोलनासाठी मलकापूर रोड बोदवद, जामठी, एणगाव येथे तीन ठिकाणी डिस्प्ले लावण्यात आले होते. बोदवड तालुका काँग्रेस पक्षाचे निरिक्षक जलील सत्तार पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी शेतमजूर सामान्य जनता आणि काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना लाईव्ह दाखवण्यात आले. यानंतर स्वाक्षरी मोहिमेचाही शुभारंभ करण्यात आला
यावेळी भुसावळ सेवा फौंडेशनच्या शहराध्यक्षा मीनाक्षी जावरे, बोदवड तालुकाध्यक्ष ईश्वर जंगले, शहराध्यक्ष महेबूब शेख चांद, माजी तालुकाध्यक्ष बाळू पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, नगरसेवक इरफान शेख चांद, सुुभाष रेवकर,भरत पाटील, एणगाव येथील भगवान पाटील, गुलाबखा पठाण उपस्थित होते तसेच जामठी येथे सरदारसिंग पाटील, राजेंद्र शेळके, पवन महाजन, समाधान पाटील, नारायण महाराज, विकास पाटील, येवती येथील शुभम पाटील, इरफान पठाण यांच्या समवेत शेतकरी बांधव संतोष पाटील, पांडुरंग पाटील, भगवान जंगले, प्रभाकर महाजन उपस्थित होते.