बोढरे ते धुळे महामार्ग चौपदरीकरण कामाला लवकरच होणार सुरूवात

चाळीसगाव प्रतिनिधी । खासदार उन्मेषदादा पाटील यांच्या पाठपुराव्याने बोढरे ते धुळे Dhule या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात येत असून लवकरच या कामास प्रारंभ होणार असल्याची माहिती आज त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

खासदार उन्मेषदादा पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन बोढरे ते धुळे Bodhre to Duhle या महामार्गाचे चौपदरीकरण होणार असल्याची माहिती दिली. ते म्हणाले की, हा महामार्ग धुळे चौफुली ते कन्नड घाटाच्या पायथ्याशी असणार्‍या बोढरे गावापर्यंत होणार आहे. हे एकूण अंतर ६७.२३१ किलामीटर इतके आहे. या कामासाठी २७-१०-२०२० रोजी निविदा निघाली असून याच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील कन्नड ते सोलापूर दरम्यान चौपदरीकरणाचे काम पूर्ण होत असताना कन्नड घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चाळीसगाव तालुक्यातील बोढरे फाटा ते धुळे या सुमारे ६७.२३१ किमी रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम गेल्या तीन ते चार वर्षांपासून रखडले होते रखडले होते.

या चौपदरीकरणाच्या कामाच्या निविदेचे एकूण मूल्य 1007 कोटी रूपये इतके असून अहमदाबाद येथील कलथीया इंजीनियरिंग कंट्रक्शन या कंपनीला याचे काम मिळालेले आहे. प्रत्यक्षात या कामास लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती खासदार उन्मेषदादा यांनी दिली. या कामासाठी केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्यानंतर या कामाला मान्यता मिळाल्याचे त्यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केले.

या चौपदरीकरणाच्या कामात गिरणा नदी, विंचूर बोरी नदी, चाळीसगाव बायपास खडकी आणि चाळीसगाव बायपास मालेगाव रोड हे चार मोठे पूल तयार करण्यात येणार आहेत. तर यावर मालेगाव रोड चाळीसगाव बायपास, मेहुणबारे बायपास व शिरूड चौफुली येथे तीन मोठे अंडरपास असतील. यासोबत पाटणादेवी वालझीरी चौफुली बायपास, जुनोने गावाजवळ तसेच गरताड बायपास येथे लहान अंडरपास असणार आहेत. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या भारतमाला परियोजनेतून हायब्रीड एन्युटी अंतर्गत या चौपदरीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

दरम्यान, खासदार उन्मेषदादा पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सोलापूर ते धुळे महामार्गावरील महत्वाच्या टप्प्याचे चौपदरीकरण होत असल्याची माहिती दिली. यासाठी आपण केंद्रीय भूतल परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे सांगितले. तसेच, हा मार्ग दिल्ली ते मुंबई हायवे आणि समृध्दी महामार्ग या दोन्हींना जोडणार असून यामुळे परिसरातील प्रगतीला गती येईल असा आशावाद व्यक्त केला.

पंचायत समितीचे उपसभापती भाऊसाहेब पाटील, गटनेते संजय भास्कर पाटील, दिनेश बाेरसे, माजी तालुकाध्यक्ष के.बी. सांळुखे, तालुकाध्यक्ष प्रा. सुनील िनकम, शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, वसंत चंद्रात्रे अादी उपस्थित हाेते.

Protected Content