गेटवे ऑफ इंडियाजवळ बोट उलटली; बचावकार्य सुरू

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबईतील प्रसिद्ध गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवाशांनी भरलेली बोट समुद्रात उलटल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन प्रवाशांचा मृत्यू झाला असून ६६ प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बोट गेट ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जात असताना ही दुर्घटना घटना घडली. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावरून एलिफंटा बेटाकडे जाणारी बोट दुपारी चार वाजताच्या सुमाारास अचानक समुद्रात बुडू लागली. यानंतर स्थानिक मासेमारी नौकांच्या मदतीने नौदल, जेएनपीटी, तटरक्षक दल आणि यलोगेट पोलिस स्टेशन ३ यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत आणि बचावकार्याला सुरूवात केली. अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. नीलकमल असे या बोटीचे नाव आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

‘मला मुंबईतील गेट ऑफ इंडियाजवळ प्रवासी बोट समुद्रात बुडाल्याची माहिती मिळाली. त्या बोटीवर अंदाजे ३० ते ३५ जण होते. त्यापैकी २० जणांना वाचवण्यात यश आले आहे. तर, ५ ते ७ जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे’, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांनी मुंबई बोट दुर्घटनेवर आपली प्रतिक्रिया दिली. मुंबईतील समुद्रात एक बोट उलटली आहे. या बोटीत सुमारे ३०-३५ प्रवाशी होते, असे समजत आहे. हा मुद्दा आम्ही सभागृहात मांडला. बचावकार्य सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. आम्ही आशा करतो की, प्रत्येकजण सुरक्षित आहे. एकाचा मृत्यू झाल्याची बातमी आहे’

Protected Content