


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी रावेर तालुक्यातील पाल येथील श्री वृंदावन धाम मधील कार्यक्रमांसह विविध ठिकाणी उपस्थित राहून गुरुवंदना केली आणि संत महंतांचे आशीर्वाद घेतले.
गुरुपौर्णिमेनिमित्त सुने सावखेडा येथील कष्टभंजन मंदिराच्या परिसरात गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील रक्तपेढीतर्फे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी डॉ. केतकी पाटील यांनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे अभिनंदन केले. तसेच, त्यांनी मंदिराचे दर्शन घेऊन श्री प.पू. सद्गुरू जगतप्रकाश स्वामी आणि श्री चेतन भगत स्वामी यांचे आशीर्वाद घेतले. याव्यतिरिक्त, डॉ. केतकी पाटील यांनी निषकलंक धाम येथे जाऊन परमपूज्य महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचेही आशीर्वाद घेतले.
रावेर तालुक्यातील पाल येथील श्री वृंदावन धाम येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्रद्धेय गोपाळ चैतन्य महाराज यांचे प्रवचन व भजनाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमातही डॉ. केतकी पाटील सहभागी झाल्या आणि त्यांनी महाआरती केली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते आणि भजनाच्या तालावर ठेका धरत होते. याप्रसंगी डॉ. केतकी पाटील यांनी गोपाळ चैतन्य महाराज यांच्यासोबत दिव्य चैतन्य महाराज, शाम चैतन्य महाराज आणि नवल चैतन्य महाराज यांच्याशी संवाद साधला.
डॉ. केतकी पाटील यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन गुरुपौर्णिमेचा हा पवित्र दिवस साजरा केला, ज्यामुळे त्यांच्या कार्याला संत-महंतांचे आशीर्वाद लाभले.



