आंबेडकर जयंती निमित्त विद्यापीठात रक्तदान शिबीर

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी ।  येथील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावतर्फे महात्मा फुले- बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिरात जवळपास 75 विद्यार्थी, कर्मचारी व प्रधायपकांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे विद्यापीठाचे प्र. कुलसचिव डॉ. किशोर पवार यांनीही रक्तदान करन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एल. माहेश्वरी, प्र. कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, प्रा. डॉ. म. सु. पगारे, इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे डॉ प्रकाशचंद जैन, अनिता वाघ, सुनील पावरा आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी अरुण सपकाळे,राजू सोनवणे,जयंत सोनवणे, दुर्योधन साळुंखे, भैय्या पाटील आदींनी परिश्रम घेतले.

 

Protected Content