डॉ. उल्हास पाटील कृषि महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एस.सी.तायडे उपप्राचार्य प्रा.पी.एस.देवरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. वैशाली राणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. त्यानंतर उपप्राचार्य प्रा पी.एस देवरे यांनी विद्यार्थ्यार्ंना महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती दिली. तसेच शिक्षण प्रभारी प्रा. एस. एन. पाटील, प्रा. मोनिका भावसार यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. त्यांनतर कार्यक्रमाचे अध्यक्ष  डॉ. एस.सी.तायडे यांनी महात्मा फुले यांच्या जीवनातील अनुभव सांगुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी कलयाण अधिकारी प्रा.आर.डी.चौधरी, प्रा. वैशाली पुसदेकर, प्रा.श्रुती गवारकर, प्रा.मोनिका भावसार, प्रा.शुभम गोद्रे, प्रा.एस.बी.इंगोले, प्रा.एस.जी.सुरडकर, प्रा.अमोल सोहनी, प्रा.निलेश सदार व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.वैशाली राणे यांनी केले.

 

Protected Content