Home Cities जामनेर शेंदुर्णी येथे ‘आचार मालिका प्रवचनमाला’

शेंदुर्णी येथे ‘आचार मालिका प्रवचनमाला’

0
61


शेंदुर्णी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गोपाला मेगा सीटी परिसरात गुरूवार ५ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजता आचार मालिका प्रवचन सोहळ्यात आचार्य मंहंताची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील गोपाला मेगा सिटीमध्ये ५ डिसेंबरपासून महानुभाव पंथीयांचा आचार मालिका प्रवचन सोहळा सुरु आहे. या सोहळ्याची सांगता ६ जानेवारीला होणार आहे. यानिमित्ताने गुरूवारी ५ जानेवारी दुपारी १२ वाजता भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. मिरवणुकीची सुरुवात गोपाला मेगा सिटीमधून सुरू होऊन बसस्थानक, सार्वजनिक वाचनालय चौक, युनियन बँकेकडून, आठवडी बाजार, गांधी चौक, आहिल्याबाई होळकर चौक या मार्गाने जाऊन त्याची सांगता गोपाला मेगा सिटीत करण्यात आली. या भव्य शोभायात्रेत अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन मंडळाचे अध्यक्ष आचार मालिका प्रवचन सोहळ्याचे प्रवाचक आचार्य परमपुज्य आन्मय आचार्य लोणारकर बाबा महानुभाव यांची घोडा बग्गीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. या सोहळ्यात महानुभाव पंथातील आचार्य, महंत, तपस्विनी, उपदेशी, हजारोच्या संख्येने उपस्थित आहेत. शोभा यात्रेत पालखी सोहळा व हेलिकॉप्टरने पालखी व शोभायात्रातील सहभागी आचार्य यांच्यावर पुष्पवृष्टी केला गेला. गोपाला मेगा सिटी मध्ये सुरू असलेल्या आचार मालिका प्रवचन सोहळ्याचे आयोजक गोविंद अग्रवाल व परिवार, महानुभाव दत्त मंदिर संस्थान शेंदुर्णी यांच्यावतीने प्रवचन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी ६ जानेवारी रोजी या सोहळ्याची सांगता करण्यात येणार आहे.


Protected Content

Play sound