बिहारमध्येही भाजपाचा दोन उपमुख्यमंत्री पॅटर्न

पाटणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बिहारमध्ये आज राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली आहे. जेडीयू प्रमुख नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्ता स्थापनाचा दावा केला आहे. त्यांना भारतीय जनता पक्ष प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पाठिंबा दिला आहे. आज सायंकाळी पाच वाजता नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

नव्या सरकारमध्ये भाजपने दोन नेत्यांना उपमुख्यमंत्रीपदाची संधी दिली आहे. विजय सिन्हा आणि सम्राट चौधरी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. भाजपने या दोन नेत्यांना संधी देण्यामध्ये जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केला आहे.

Protected Content