भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हाधिकारी अमन मित्तल हे भडगाव शहरातील आढावा बैठकीला आले होते.त्यावेळी भाजपाचे नेते अमोल शिंदे यांनी जिल्हाधिकऱ्यांची भेट घेवून भडगाव तालुक्यात जुन २०१९ मध्ये झालेल्या वादळीवाऱ्याने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणीचे निवेदन दिले आहे.
भडगाव व पाचोरा येथील शेतकऱ्यांना पिकाविमा काढतांना सोयाबीन पिकाचा समावेश करण्यात यावा कारण सध्या पिकविमा शेतकरी वर्ग काढत असताना तेथे सोयाबीन या पिकाचा समावेश दिसत नसल्यामुळे सोयाबीन धारक शेतकऱ्यांना पिकाविमा काढता येत नाही. त्यामुळे या पिकाचा समावेश करण्यात या संदर्भात निवेदन देण्यात आले. या निवेदनावर भाजपाचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे,भडगाव भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल नाना पाटील, भाजपचे जिल्हा चिटणीस सोमनाथ पाटील यांच्या सह्या आहेत यावेळी भाजपचे शहराध्यक्ष बन्सीलाल परदेशी,युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष किरण शिंपी,कोठलीचे माजी.सैनिक समाधान पाटील, मुन्ना परदेशी, प्रदिप कोळी,कुणाल पाटील यांच्या सह पदाधिकारी उपस्थित होते.