Home Cities भडगाव भडगाव नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर

भडगाव नगरपालिका आरक्षण सोडत जाहीर

0
250

bhadgaon

भडगाव प्रतिनिधी । भडगाव नगरपरीषद सार्वत्रिक निवडणुक २०२० प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्दी व आरक्षण सोडत आज १८ रोजी जाहीर करण्यात आले. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे आणि मुख्याधिकारी विकास नवाळे यांची उपस्थिती होती.

आरक्षण सोडत प्रभाग निहाय याप्रमाणे
प्रभाग क्र.१ – सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.२ – अनुसुचित जमाती महिला राखीव
प्रभाग क्र.३ – सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.४ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्र.५ – सर्वसाधारण
प्रभाग क्र.६ – सर्वसाधारण
प्रभाग क्र.७ – नागरिकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्र.८ – सर्वसाधारण
प्रभाग क्र.९ – सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.१०- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
प्रभाग क्र.११- सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.१२- अनुसुचित जाती
प्रभाग क्र.१३- सर्वसाधारण
प्रभाग क्र.१४- सर्वसाधारण
प्रभाग क्र.१५- अनुसुचित जमाती
प्रभाग क्र.१६- नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
प्रभाग क्र.१७- सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.१८- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव
प्रभाग क्र.१९- सर्वसाधारण महिला राखीव
प्रभाग क्र.२०- नागरीकांचा मागास प्रवर्ग
प्रभाग क्र.२१- सर्वसाधारण महिला राखीव

लहान मुलगा दुर्गेश भोसले व वेदांत भदाणे यांच्याहस्ते आरक्षण सोडत चिठ्ठ्या इच्छुक उमेदवारांच्या समक्ष लाइव्ह काढण्यात आला. कही खुशी कही गम अशी परीस्थिती या क्षणी उमेदवारांच्या चेहर्‍यावर पाहायला मिळाली सदरची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्दी व आरक्षण सोडत कार्यक्रम हा पारदर्शक पार पडला आहे. तरी कुणाच्या काही हरकती असल्यास २० ते २६ फेब्रुवारी २०२० पर्यंत सुचना व हरकतींची अंतिम मुदत आहे. याची सुनावणी २९ रोजी जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत होणार आहे. अंतिम प्रभाग रचना १३ मार्च २०२० रोजी प्रसिध्द करण्यात येईल अश्या सुचना प्रांताधिकारी राजेंद्र कचरे केले आहे.


Protected Content

Play sound