यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाविकास आघाडीहे सत्ताधारी असतांना कंत्राटी कामगार भरतीबद्दल घेतल्या दुटप्पी भूमिकेच्या विरोधात यावल शहरातील भाजपाच्या विरोधात महाविकास आघाडीचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आला.
महाराष्ट्र राज्यात सरकार मध्ये असताना स्वतःच्या कार्यकाळात सुरू केलेल्या कंत्राटी भरती विषयी आता विरोधात असताना दुटप्पी भूमिका ठेवत राज्यातील तरुण मित्र मंडळीच्या भविष्याशी खेळणाऱ्या महाविकास आघाडी विरूध्द यावल शहरातील बुऱ्हाणपुर अंकलेश्वर राज्य मार्गावरील भुसावळ टी पाँईटवर भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्या नेतृत्वाखाली तत्कालीन महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध प्रदर्शन करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन , तालुका अध्यक्ष उमेश फेगडे ,किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील, उमेश पाटील, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, माजी नगरसेवक डॉ कुंदन फेगडे, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सागर कोळी, माजी तालुका अध्यक्ष डॉ एन जी कोल्हे , ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष हेमराजे फेगडे,भाजपाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे,पांडुरंग सराफ , व्यंकटेश बारी, भुषण फेगडे यांच्या सह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते युवा मित्र मोठ्या संख्येने या निषेध आंदोलनात सामील झाले होते.