वेगळेपण राखणाऱ्या पंचायतींचा कित्ता गिरवत विकास साधावा – वासुदेव नरवाडे

अखिल भारतीय सरपंच परिषदेची बैठक;

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राज्यात अनेक ग्रामपंचायतींनी गावस्तरावर स्वतःच निर्णय घेत लोकसहभागातून तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत आपापली गावे विकसित करण्याचा धडाका लावला आहे.अशा आदर्शवत पंचायतींचा कित्ता गिरवत प्रत्येक सरपंच आणि गावकारभाऱ्यांनी आपले गाव सर्व बाबतीत समृद्ध करण्यावर भर द्यावा तरच आपण लोकांचा विश्वास जिंकून आपल्या पदाला न्याय देऊ शकतो अशी भावना सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष वासुदेव नरवाडे यांनी व्यक्त केली..

अखिल भारतीय सरपंच परिषदेची तालुका बैठक येथील विश्रामगृहात नुकतीच संघटनेचे जिल्हाध्यक्ष व विवरे (ता.रावेर) येथील माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वासुदेव नरवाडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.

प्रदेश संघटक रुपेश गांधी, निरीक्षक तथा निंभोरा ग्रामपंचायत सदस्य दस्तगीर खाटीक व निंभोरा सिम उपसरपंच उमेश वरणकर यांच्यासह तालुक्यातील बहुतांश सरपंच उपस्थित होते.येत्या काळात ग्रामपंचायतीचा कारभार करतांना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, सरपंच – सदस्यांचे मानधन व भत्ते नियमित मिळावे यासाठी राज्य संघटनेच्या नियोजनानुसार पाठपुरावा करण्यात येईल असे सर्वानुमते ठरले. बैठकीला रामराव पाटील हिंगणा,अजय पाटील वराड, शांताराम बोरसे शिरसाळा मारोती, बापू देशमुख गोळेगाव, श्रीकांत कोळी सुरवाडा, निना पाटील मनुर बु॥ फिरोज खान इस्माईल,प्रल्हाद किनगे भानखेडा यांच्यासह तालुक्यातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

तालुका कार्यकारिणी जाहीर

पंचायतराज विकास मंच संचालित अखिल भारतीय सरपंच परिषदेचे कार्य संपूर्ण राज्यभर विस्तारले असून संघटनेचे संस्थापक व विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील कुर्डुकर व प्रदेश सरचिटणीस विवेक ठाकरे यांच्या मार्गदर्शना खाली जिल्ह्यात सुद्धा संघटनेची फेररचना करणे सुरु असून त्या पार्श्वभूमीवर बोदवड तालुका पदाधिकारी बैठकीत जाहीर करण्यात आले. बोदवड तालुकाध्यक्षपदी प्रविण शांताराम पाटील (शिरसाळा), सचिव संजय पाटील (वडजी), उपाध्यक्ष प्रमोद गोविंदा शेळके (राजुर)तर कार्यकारिणीत  सदस्य म्हणून विशाल गणेश गडेकर (सरपंच वाकी), प्रविण आनंदा पाटील (सरपंच नांदगाव), ज्ञानेश्वर पाटील (सरपंच सुरवाडा खुर्द), किशोर गोपाळ वानखेडे (सरपंच चिंचखेड सिम), अनिल मोरे (सरपंच भानखेडे), समाधान बोदडे (सरपंच शेलवड), नंदलाल पाटील (सरपंच करंजी), रमेश सुरंगी (सरपंच निमखेड) अशी सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली.

Protected Content