शिवसेनेतर्फे शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनात शाळा भरवण्याचा इशारा

shivsena nivedan

बोदवड, प्रतिनिधी | तालुक्यातील शेवगा खु येथे जि.प. मराठी शाळेत गेल्या कित्येक दिवसांपासुन शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पटसंख्येचा आलेख घसरत चाललेला आहे. ग्रामस्थांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देवून व वारंवार चकरा मारुनही शिक्षक उपलब्ध झालेला नाही.

 

इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत एकच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलले जात आहे. शेवगा खु येथील ग्रामस्थांनी याबाबत शिवसेनेकडे तक्रार केली असता शिवसेनेतर्फे गटशिक्षणाधिकाऱ्यांना तसे निवेदन देण्यात आले. येत्या दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करुन न दिल्यास गट शिक्षणाधिकारी यांच्या दालनातच विद्यार्थ्यांना घेऊन शाळा भरविणार असल्याचा इशारा या निवेदनातून यावेळी देण्यात आला आहे.

शेवगे खुर्द येथे १ ते ४ थी पर्यंत शाळेचे वर्ग आहेत. शैक्षणिक सत्र सुरु झाल्यापासुन येथील शाळेमध्ये किमान तीन शिक्षक गरजेचे असतांना केवळ एकाच शिक्षकाकडे सगळा पदभार असल्याने गोरगरीब, शेतकरी, शेतमजुरांच्या पाल्यांची मोठी शैक्षणिक कुचंबणा होत आहे.

Protected Content