जळगाव, राहूल शिरसाळे | भारतीय जनता पक्षातर्फे संविधान दिनानिमित्त जिल्ह्यातून भारतीय संविधान गौरव रथयात्रा काढण्यात आली आहे
भारतीय संविधान दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पक्षातर्फे जिल्ह्यातून भारतीय संविधान गौरव रथयात्रा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने जळगाव रेल्वे स्थानक येथील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून भारतीय संविधान गौरव रथयात्रा मार्गस्थ झाली. रथावर स्क्रीनच्या माध्यमातून डिजिटल दृश्यप्रणालीद्वारे संविधानाने दिलेली मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांचे मूलभूत हक्क याविषयी जनजागृती करण्यात येत आहे.
भाषणाचा अधिकार, न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार यासह अनेक अधिकारांची जाणीव नागरिकांना करुन देण्यात येत आहे. देशाचे सार्वभौमत्व एकता व अखंडता अबाधित राहावी, पर्यावरणाचं संतुलन आणि संवर्धन, एकोपा वाढावा यासाठीची जागृतीही केली जात आहे. संविधानाने सुरक्षित आणि मार्गदर्शक तत्त्वं केलेले आहे याविषयीची माहितीही या रथयात्रेच्या माध्यमातून दिली जात आहे.
याप्रसंगी जळगाव जिल्ह्याचे आमदार सुरेश भोळे यांनी ‘लाईव्ह ट्रेड न्यूज’शी संवाद साधला. ते म्हणाले, “कालच आ.गिरीश महाजन यांच्याहस्ते या संविधान गौरव रथयात्रेचं उद्घाटन झालं. आज जळगाव शहरात जनजागृती करुन संपूर्ण जळगाव जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात जावून रथयात्रेच्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व विशद केले जाणार आहे. दिनांक 27 तारखेपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकशाहीला बळकट करणारा मतदानाचा अधिकार दिला त्याची जागृती करण्याचाही उद्देश आहे” असं ते म्हणाले.
याप्रसंगी “लोकांची आघाडी सरकारविषयी तीव्र नाराजी आहे आणि लोकांची दिशाभूल करण्यासाठी भाजपच्या पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावर काहीतरी गुन्हा दाखल करावेत असा केविलवाणा प्रयत्न आघाडी सरकार करत आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो…” असं मत त्यांनी व्यक्त केलं. पुढे बोलतांना, “जनतेला न्याय देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जनांदोलन आमचा हक्क आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले आम्ही लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आमचं आंदोलन सुरूच ठेऊ..” असा निर्धार त्यानी व्यक्त केला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, याप्रसंगी जिल्हाध्यक्ष, आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी, विशाल त्रिपाठी, प्रकाश पंडित, विशाल पाटील, आघाडी अध्यक्ष लताताई बाविस्कर, प्रभाकर तायडे, सागर पाटील, ज्योती निंभोरे, धीरज वर्मा, अश्फाक शेख, मंडळ अध्यक्ष केदार देशपांडे, शक्ती महाजन, संजय लुल्ला, सरचिटणीस संजय गावंडे, सुभाष शौचे, अजय जोशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
फेसबुक व्हिडिओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/989709638252831