धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । निवडणुकांच्या निकालामध्ये भाजपच्या उमेदवार मोठ्या फरकाने विजय मिळाविला आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथे भाजपने विजय प्राप्त केला आहे. या अनुषंगाने रविवारी ३ डिसेंबर रोजी धरणगाव तालुका भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
मध्यप्रदेश, राजस्थान छत्तीसगड आणि तेलंगणा चार राज्यातील निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. यामध्ये तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठे यश मिळाले आहे. यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड मध्ये भाजपने सत्ता मिळवली आहे. भाजपला यश मिळाल्यानंतर धरणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी रविवारी ३ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केल्याचे पाहायला मिळाले. याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय महाजन, हेडगेवार ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, सुभाष पाटील, शहराध्यक्ष दिलीप महाजन, कन्हेय्या रायपूरकर, कैलास माळी, शिंदे गटाचे विजय महाजन, बाळासाहेब जाधव, विलास महाजन, वाल्मीक पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.