मुक्ताईनगर मतदारसंघाला तीस वर्षाच्या गुलामीतून मुक्त करा – डॉ अमोल कोल्हे

WhatsApp Image 2019 10 17 at 5.55.15 PM

बोदवड, प्रतिनिधी | गेल्या ३० वर्षापासुन राजकीय गुलामीत असलेल्या  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाला मुक्त करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांना निवडुन द्या असे आवाहन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. ते शहरात आज गुरुवार ( दि.१७) रोजी गांधी चौक येथे राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहिर सभेत बोलत होते.

डॉ अमोल कोल्हे, पुढे म्हणाले की, एकनाथ खडसे यांची घराणेशाही आहे. ते घरामध्ये महानंद , खासदार, आमदार, जिल्हा बँक चेअरमन, सर्व राजकीय पदे घरात घेउन जनतेची दिशाभुल करीत आहेत. गेल्या ३० वर्षापासून मुक्ताईनगर मतदारसंघात कुठलाही विकास झालेला नाही. माझ्या सारख्याला २ किलोमिटरवरुन येतांना ३० मिनिट जर लागत असतील तर बोदवड तालुक्यातील जनता कशी सहन करीत आहे ? असा प्रश्न उपस्थित केला.  यापुढे मतदार जागे होउन ३० वर्षाचा इतिहास खड्यात घालतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात शासनाने गडकिल्ले भाड्याने देण्याचा घाट घातला तसेच शिवाजी महारांचा इतिहास चौथीच्या पुस्तकातुन बाद करण्यात आला याची आठवण करून दिली. तसेच कलम ३७० याचा सबंध महाराष्ट्राशी नसुन तो देशाचा प्रश्न असून त्याचा  महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा काहीही सबंध नाही. पाच वर्षात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. कपाशी, सोयाबीन यासह धान्यांना हमी भाव दिला नाही. संविधानामुळे सर्वांना समान अधिकार मिळाल्याने या मतदारसंघात ट्रँक्टरने नागरटी करुन ३० वर्षाचा इतिहास बदलुन चंद्रकांत पाटील यांना विजयी करा असे डॉ. कोल्हे यांनी आवाहन केले. यावेळे विचार मंचावर अॅड. रविंद्र पाटील, उमेदवार चंद्रकांत पाटील, माजी आमदार अरुण पाटील , माजी नगर अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, विनोद तराळ , तालुका अध्यक्ष उध्दवराव पाटील, विरेंद्रसिंग पाटील, इश्वर जंगले, अमोल देशमुख, दीपक झांबड, आवंदा पाटील, विजय पालवे, गजानन खोडके, नईम खान, छोटु भोई, अफसर खान यांच्यासह रावेर , मुक्ताईनगर , बोदवड तालुक्यातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content