Home धर्म-समाज माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

माझ्या आत्महत्येला भाजपा-शिवसेना सरकार जबाबदार; चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या


यवतमाळ (वृत्तसंस्था) यवतमाळमधील एका शेतकऱ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत भाजपा-शिवसेना सरकार माझ्या आत्महत्येस जबाबदार असल्याचे म्हटले आहे. शेतकऱ्याने लिहिलेली चिठ्ठी मृतदेहाशेजारी आढळून आली. पांढरकवडामधील पहापळचे रहिवासी असलेल्या 52 वर्षीय धनराज बळीराम नव्हाते यांनी काल आत्महत्या केली.

 

नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून धनराज नव्हाते यांनी विषप्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मृतदेहाजवळ सापडली. यामध्ये त्यांनी त्यांच्या अवस्थेसाठी राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारला जबाबदार असल्याचे म्हटले आहे. नव्हाते यांची 4 एकर शेती असून त्यांच्यावर सावकाराचे 2 लाखांचे कर्ज होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. गेल्या काही वर्षांमध्ये नापिकीमुळे धनराज यांचे शेतीत मोठे नुकसान झाले, अशी माहिती त्यांच्या कुटुंबाने दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound