सत्तास्थापनेचा पेच निर्माण होण्यास भाजपाच जबाबदार : उद्धव ठाकरे

udhav

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात सत्तास्थापनेचा जो पेच निर्माण झाला आहे त्यासाठी भाजपाच जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवरील बैठकीत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

 

यावेळी ठाकरे यांनी म्हटले की, जेव्हापासून पेच निर्माण झाला आहे तेव्हापासून देवेंद्र फडणवीस वगळता नरेंद्र मोदी किंवा अमित शाह यांचा फोन आला नाही. गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरु आहे, त्याला आज अंतिम स्वरुप मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले. थोड्याच वेळात निर्णय येणार असून शिवसेना आमदारांनी मुंबईतच थांबावे, असे आदेशही ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच शिवसेनेचाचं मुख्यमंत्री होणार असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांना बैठकीत दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंना दिलेलं वचन आपण पूर्ण करणार आहोत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

Protected Content