भाजपाध्यक्षांनी गोरेगावातून केला प्रचाराचा शुभारंभ

amit shaha

मुंबई प्रतिनिधी । गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित सभेद्वारे भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात भाजपच्या प्रचाराचा शुभारंभ केला. त्यावेळी म्हणाले, ‘राज्यात पूर्ण बहुमताने पुन्हा भारतीय जनता पक्षाचेच सरकार येणार असल्याची घोषणा करत त्यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भाजप शिवसेना युतीसंदर्भात कोणतेही भाष्य न करता आगामी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करताना त्यांनी मुख्यमत्र्यांनी केलेल्या कामांचे कौतुक केले. महाराष्ट्राला देशात क्रमांक एकवर कायम ठेवण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राज्यात गुंतवणूक, शेती, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्याला पुढे आणले. त्यावेळी त्यांनी कलम ३७० वर पक्ष आणि केंद्र सरकारची भूमिका मांडली. तसेच सन २०१९ पासून केवळ ३७० मुळेच काश्मीरमध्ये ४० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यामुळे तेथून दहशतवाद हद्दपार होणार आहे. सरकारच्या या निर्णयावर टीकास्त्र सोडणारे शरद पवार यांनी कान उघडून ऐकावे असा टोलाही त्यांनी शरद पवार यांना लगावला. कलम ३७० हटवण्याला शरद पवार आणि काँग्रेस पक्षाने विरोध केल्याचेही ते म्हणाले. गेल्या ५ ऑगस्टपासून काश्मिरात एकही गोळी चाललेली नाही, हेही लक्षात घेण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

Protected Content