भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा दिला राजीनामा

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी स्विकारला आहे. पार्लमेंटच्या डेली बुलेटिनमधून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, नड्डा यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा का दिला याचं कारणही समोर आलं आहे.

नड्डा यांना गुजरातमधून नुकतीच भाजपनं राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली होती. या ठिकाणी भाजपचे चारही उमेदवार नुकतेच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये नड्डा यांचाही समावेश आहे. हिमाचल प्रदेशातून राज्यसभेवर गेलेल्या नड्डा यांची टर्म संपण्याआधी त्यांना भाजपनं गुजरातमधून उमेदवारी दिली. त्यामुळं सहाजिकचं त्यांनी आधीच्या राज्यसभा निवडणुकीच राजीनामा दिला आहे

Protected Content