मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अयोध्येत २२जानेवारीला पार पडणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे २२ जानेवारी रोजी देशासह राज्यात दारू आणि मांसबंदी करण्याची मागणी केली आहे. राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहीत ही मागणी केली आहे.
”अयोध्येत होणाऱ्या 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. या पवित्र दिवसाचे महत्व लक्षात घेता त्यादिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी याबाबत…. तसेच महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला विनंती करून त्यादिवशी संपूर्ण देशभर देखील त्या दिवसासाठी दारू बंदी करण्याची विनंती करावी.. ही करोडो रामभक्तांची आपणास विनंती आहे”, असे राम कदम म्हणाले.
मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्रात राम कदम म्हणाले, “जवळपास 500 वर्षानंतर अयोध्येमध्ये राम मंदिर उभारण्यात येणार आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कार सेवकांनी यातना भोगल्या आहेत. प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला आहे. येत्या 22 जानेवारीला उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूतींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे. संपूर्ण हिंदुस्थानात या पवित्र दिवसाला एखादया सणाचे महत्त्व आले आहे. आपण 22 जानेवारी या पवित्र दिवसाकरीता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि मास बंदी करण्यात यावी”, असे विनंती करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहले आहे.