यावल येथे जितेन्द्र आव्हाडच्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील शहरातील भुसावळ टी पाँईटवर ३० मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे ) आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाशरद पवार गटाचे आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी राष्ट्रीय शैक्षणीक धोरणानुसार एससीई आरटीने राज्यातील शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृती मधील दोन लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला असुन, अशात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गटाचे) आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी मुंबई मधील महाड येथील चवदार तळ्यावर एका कार्यक्रमात आक्रमक भुमिका घेत मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले असुन, महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरूद्ध जाऊन बोलले म्हणुन या घटनेच्या निषेर्धात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येवुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूद्ध घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी या विषयाला संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन विरोध दर्शविला जात असुन यावल येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या निषेधार्थ मोर्चा काढुन जोडे मारा आंदोलन करण्यात आले.

यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन मोर्चा काढण्यात आला यात भारतीय जनता पक्षाचे यावल तालुका उमेश फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषदच्या शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र उर्फ छोटू पाटील ,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे , सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजीत चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, रिपाईचे विष्णु पारधे, बबलु धारू, किशोर कुलकर्णी, यांच्यासह मोठया संख्येत भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येत हजर होते .

Protected Content