जळगाव प्रतिनिधी । भाजप जिल्हाध्यक्ष निवडीतील आजच्या गोंधळावरून हा गुंडांचा पक्ष असल्याची टीका आमदार अनिल भाईदास पाटील यांनी केली आहे. ते जिल्हा बँक संचालकांच्या बैठकीसाठी आले असतांना प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
आज भाजप जिल्हाध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत प्रचंड गोंधळ झाला. याबाबत आमदार अनिल भाईदास पाटील यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, भाजपमध्ये गेल्या पाच वर्षात असे प्रकार अनेकदा घडले आहेत. अलीकडेच भाजपने जिल्हा परिषदेत पेढे वाटले. खरं तर पेढे हे साखरेच्या पाकापासून तयार केलेले असतात. मात्र भाजपचे पेढे हे कडूलिंबाच्या पाकापासून तयार केले असल्याची खोचक टीका त्यांनी केली. भाजप हा गुंडांचा पक्ष असल्याचेही ते म्हणाले. गिरीश महाजन हे सध्या मंत्री नसले तरी मंत्र्यांच्या तोर्यातच वागत असल्याचा टोलादेखील त्यांनी मारला.
पहा : अनिल भाईदास पाटील नेमके काय म्हणालेत ते ?