Home Cities जळगाव जळगावात भाजपचेच वर्चस्व- आ. गिरीश महाजन ( व्हिडीओ )

जळगावात भाजपचेच वर्चस्व- आ. गिरीश महाजन ( व्हिडीओ )

0
39

जळगाव प्रतिनिधी । विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला तरी जळगावात भाजपचेच वर्चस्व सिध्द झाल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. ते जि.प. सभापतींच्या निवडीनंतर पत्रकारांशी बोलत होते.

आज जिल्हा परिषदेच्या सभापतींची निवड करण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आ. गिरीश महाजन म्हणाले की, सर्व विरोधकांनी एकत्र येण्याचा प्रयत्न करून देखील त्यांना यश आले नाही. यामुळे जिल्ह्यात भाजपचेच वर्चस्व असल्याचे सिध्द झाले. जिल्हा परिषद सभापतीपदासाठी अनेक जण इच्छुक असले तरी पद चारच असल्याने काहींची नाराजी स्वाभाविक असल्याचे प्रतिक्रियादेखील त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, राज्यातील महाआघाडी सरकारचे काही खरे नसल्याचेही आ. महाजन म्हणाले.

पहा :- आ. गिरीश महाजन नेमके काय म्हणाले ते ?

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3158284200853382


Protected Content

Play sound