Home राजकीय भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत – सुधीर मुनगंटीवार

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत – सुधीर मुनगंटीवार

0
55


मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | भाजप बंडखोर आमदारांसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा सुरु असताना राज्यासमोरचे राजकीय प्रश्न लक्षात घेऊन भाजप काय करायचे ते ठरवेल असे म्हणतच सध्यातरी आम्ही ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत असल्याचे भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

भाजपच्या कोअर कमिटीत नेमकं काय ठरलं याविषयी सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “भाजपने सध्यातरी सरकार स्थापनेचा किंवा कोणत्या पक्षासोबत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नसून आम्ही वेट अँड वॉच या भूमिकेत आहोत. भाजपला शिंदे गटाकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर विधिमंडळात निर्माण होणाऱ्या परिस्थितीचे आकलन केले गेले असून गरज पडल्यास पुन्हा कोअर टीमची बैठक घेऊन आम्ही निर्णय़ घेऊ, असंही मुनगंटीवार यांनी सांगितले.


Protected Content

Play sound