भाजपने मुंबईच्या महापौरांविरोधात दाखल केला अविश्वास प्रस्ताव

मुंबई, वृत्तसंस्था । भाजपचे नगरसेवक आणि गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मुबंईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याविरुद्ध अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. त्यासाठी महानगरपालिका अधिनियम 1888 च्या कलम 36 (ह) अन्वये तातडीची सभा घेऊन त्यात मुंबई महापौरांवर अविश्वास ठरावाचा प्रस्ताव सादर केला.या प्रस्तावाची चर्चा करण्यासाठी महापौरांनी त्वरीत प्रत्यक्ष बैठक लावावी अशी विनंती भाजपने पत्राद्वारे केली आहे.

कोरोना रोखण्यात मुंबई पालिका अपयशी ठरली असून आरोग्य व्यवस्था अपुरी आहे. याबाबत मुंबई पालिकेतील सत्तापक्ष उदासीन असल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला. “भोजन से कफन तक” आशा नावाखाली महापालिकेत भ्रष्टाचार सुरु आहे. याला वाचा फुटू नये म्हणून महापौरांनी मागच्या 6 महिन्यात एकही बैठक घेतली नसल्याचा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.

सत्ताधारी पक्ष आणि प्रशासन यांनी हातात हात घालून भ्रष्टाचार केला. वाटण्यात आलेल्या खिचडीचा दर 40 रुपये होते. NGO चा दर 15 रुपये होता. प्रेताच्या कव्हर बॅग पालिकेने 6700 रुपयांना विकल्या. आम्ही पत्र पाठवली, आंदोलने देखील केली. आम्ही नेहमी यावर संघर्ष करत राहिलो, पण महापौरांनी एकही बैठक घेतली नाही. 36 ह अन्वये मुंबई महापौरांवर अविश्वास ठराव दाखल केला आहे. स्थायी समितीची सभा लावली असताना महापौरांनी ती रद्द केली, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.

CPD डिपार्टमेंट मधून झालेली खरेदीही चढ्या दराने झालेली आहे. ही सगळी कंत्राटं एका विशिष्ट पक्षाच्या कार्यकर्त्याला देण्यात आली. अर्थसंकल्पात शिवसेनेला जास्त वाटा देण्यात आला आणि भाजपला कमी देण्यात आला, असा आरोप प्रभाकर शिंदे यांनी केला.

Protected Content