खामगाव येथे भाजप जिल्हा सदस्य नोंदणी अभियान कार्यशाळा

खामगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | भारतीय जनता पक्ष प्रेमी अशा प्रत्येकाची सदस्य नोंदणी करा व पक्षाला पुन्हा एकदा जगातील सगळ्यात मोठा पक्ष बनवा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर यांनी केले.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भर भव्य दिव्य अशा याच्यानंतरही न थांबता भाजपा पुढील निवडणुकीसाठी तसेच पक्ष वाढीसाठी मोठ्या जोमाने ऍक्टिव्ह मोडवर झाली असून आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे.भाजपा खामगाव जिल्हा कार्यकारणी बैठक तसेच सदस्य नोंदणी कार्यशाळा आज 24 डिसेंबर रोजी दुपारी शेगाव रोडवरील ब्रह्मांडनायक मंगल कार्यालयात पार पडली, त्यावेळी ते पदाधिकाऱ्यांशी बोलत होते. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख होते तर प्रमुख उपस्थितीत भाजपा सदस्या नोंदणी अभियानाचे खामगाव जिल्हा प्रभारी अकोलाचे खासदार अनुपजी धोत्रे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा आ. चैनसुखजी संचेती, सदस्या नोंदणी अभियान प्रदेश सहसंयोजक दिनेश जी सूर्यवंशी, भाजपा सोशल मीडिया सेलचे प्रदेश सहसंयोजक सागरदादा फुंडकर, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप सांगळे राजेंद्र गांधी, गुणवंतराव कपले ,सौ अनिताताई देशपांडे, सौ कल्पनाताई मसने, मोहनजी शर्मा, ज्येष्ठ नेते गजानन बापू देशमुख, जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी ,डॉ. गणेश दातीर ,ब्रह्मानंद चौधरी, सौ सुष्माताई शेगोकार ,युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यश संचेती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सर्वप्रथम भारत माता,पंडित दीनदयाल उपाध्याय, श्याम प्रसाद मुखर्जी ,भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी, लोकनेते स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर व गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांशी पुढे बोलताना कामगार मंत्री ना. आकाश फुंडकर म्हणाले की आपल्या पक्षाची ताकद काय आहे हे दाखवून देण्यासाठी सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. दर तीन वर्षांनी भाजपाचे सदस्य नोंदणी अभियान राबविले जाते. देशातील नव्हेच तर जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी ठरलेला आहे. पुन्हा एकदा त्याच शिखरावर आपल्या पक्षाला न्यायचे आहे. नुकत्याच झालेल्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीत आपल्याला भव्य दिव्य असे यश प्राप्त झाले आहे. त्यामुळे भाजपा कार्यकर्ते निवांत झालेले आहेत. परंतु भारतरत्न श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी नेहमी सांगायचे सतत चालत रहा थांबायचे नाही थांबलो तर संपला त्याप्रमाणे आपण अधिक जोशाने सदस्य नोंदणी अभियान 2024 यशस्वीपणे राबवा प्रत्येक भाजप प्रेमी पर्यंत पोहोचवा व त्यांची सदस्य नोंदणी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय भालतीडक, दिनेशजी सूर्यवंशी, खासदार अनुपजी धोत्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना गेल्यावेळी झालेल्या सदस्य नोंदणी पेक्षा हजारो सदस्य वाढवून हे अभियान यशस्वी राबवा आणि लाखो करोडो लोकांना भाजपाच्या विचारधरणीत जोडा असे आवाहन केले.

या कार्यक्रमात नवनियुक्त राज्याचे कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर, आ. चैनसुखजी संचेती, अकोला चे खासदार अनुपजी धोत्रे यांचा भव्य दिव्य सत्कार भाजपा खामगाव जिल्हा भाजपाच्या वतीने करण्यात आला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा खामगाव जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, संचालन जिल्हा महामंत्री शरदचंद्र गायकी तर आभार प्रदर्शन जिल्हा सचिव राजेंद्र धनोकार यांनी केले.

भाजप सदस्य होण्यासाठी अत्यंत सोपी पद्धत आहे. सदस्य होण्यासाठी केवळ 8800002024 या क्रमांकावर मिस्ड कॉल करा व सदस्य व्हा. तसेच आपल्याला आपली वैयातिक माहिती द्यायची असल्यास मिस्ट कॉल केल्यानंतर आपल्याला टेस्ट मेसेज येईल त्यामध्ये असलेल्या लिंक वर जाऊन आपण माहिती भरू शकता. तसेच आपला सदस्य नोंदणी क्रमांकासहित आपल्या फोटोसह सदस्य भाजपा नोंदणी चे कार्ड डाऊनलोड करू शकता. भाजपा सदस्य नोंदणी अभियान 2024 हे एक जानेवारी ते 15 जानेवारी 2025 पर्यंत विशेषता राबविण्यात येत आहे.

Protected Content