मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी भाजपाची तयारी सुरु

Devendra Fadnavis 1

मुंबई (वृत्तसंस्था) येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे शिवसेना सोबत आली तर ठीक. अन्यथा भाजपाने एकट्यानेच शपथविधी करण्याच्या तयारीत असल्याचेही कळते. दरम्यान, ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडावा, अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची असल्याचेही वृत्त समोर येत आहे.

२०१४ प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची तयारी भाजपाने केलेली असल्याचे कळते. २०१४ साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचे समजतेय. तर आमदार प्रसाद लाड आणि चंद्रकांत देसाई यांच्याकडे मंत्रीमंडळ तयारीची जबाबदारी देण्यात आली असल्याचेही चर्चा आहे.

Protected Content