नवीदिल्ली, वृत्तसंस्था | भारतीय जनता पार्टीने विविध राज्यांमध्ये होणार असलेल्या पोटनिवडणुकांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. आज (दि.२९) भाजपाकडून ३२ उमेदवारांचा नावांची यादी जाहीर करण्यात आली. ज्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, ओदिशा, छत्तीसगड, आसम, हिमाचल प्रदेश, केरळ, मेघालय, मध्यप्रदेश, पंजाब, राजस्थान, सिक्कीम आणि तेलंगण या राज्यांधील विधानसभा पोटनिवडणुकांच्या उमेदवारांचा समावेश आहे.
भाजपाने उत्तर प्रदेशमधील विधानसभा पोटनिवडणुकीसाठी १० उमेदवारांची घोषणा केली आहे. तसेच, केरळ- ०५, आसाम- ०४, पंजाब- ०२, हिमाचल प्रदेश- ०२, सिक्कीम- ०२, बिहार- ०१, छत्तीसगड- ०१, मध्यप्रदेश- ०१, मेघालय- ०१, ओडीशा- ०१, राजस्थान- ०१, तेलंगण- ०१ या जागांचा यादीत समावेश आहे.