आ. राजूमामा विक्रमी मताधिक्याने विजयी होणार – ना. महाजन

Girish mahajan news

जळगाव प्रतिनिधी । राजू मामा हे जळगाव जिल्ह्यातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचे रेकोर्ड तोडतील, असे प्रतिपादन जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज केले. जळगाव शहर मतदार संघाचे भाजपा-सेना व रिपाइं (अ)सह मित्रपक्षाचे उमेदवार विद्यमान आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रचारार्थ आज भाजपाच्या सर्व नगरसेवकांची महत्वपुर्ण बैठक जी.एम.फाऊंडेशन कार्यालयात सायंकाळी 6 वाजता झाली. त्यावेळी ना. महाजन बोलत होते.

जळगाव शहराचे लोकप्रिय आ. राजूमाम भोळे यांच्या प्रचारार्थ भाजपच्या सार्व नगरसेवकांची महत्वपूर्ण बैठक आज ६ ऑक्टोंबर २०१९ रविवारी सायंकाळी ६ वाजता निवडणूक कार्यालय जी.एम फाउंडेशन येथे जिल्हा पालक मंत्री ना.गिरीशभाऊ महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीप्रसंगी सांगितले कि, जळगाव शहराच्या आतापर्यंतच्या इतिहासात आपले महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे (राजू मामा) यांच्या समोर विरोधक नसल्यासारखा असून तरी आजच्या बैठकी प्रसंगी उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी कुठल्याच प्रकारे गाफील न राहता आजपासून ते प्रचार संपेपर्यंत आपआपल्या प्रभागामध्ये आपण बैठका, सभा, कॉर्नर मिटिंग व जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांच्या विकास निधीतून झालेल्या विकास कामांची माहिती मतदारांपुढे मांडायची असून एक ते दोन दिवसांनी निवडणुकीच्या मुख्य प्रचाराला सुरुवात होईल. भारतीय जनता पक्ष हा देशातील एक नंबर सदस्य असलेला पक्ष असून संघटनात्मक व शिस्त पद्धतीने आपण निवडणूक कामाला लागायचे आहे.

बैठकीस यांची होती उपस्थिती
सदरील बैठकीस विभागीय संघटन मंत्री किशोरभाऊ काळकर, महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे, निवडणूक प्रमुख आ. चंदूभाई पटेल, महापौर सीमाताई भोळे, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष डॉ.संजीव पाटील, संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, जि.प. सभापती पोपटतात्या भोळे, स्थायी सभापती जितेंद्र मराठे, मनपा सभागृह नेते ललित कोल्हे, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, सरचिटणीस महेश जोशी, विस्तारक सचिन पानपाटील व समन्वयक दीपक साखरे तसेच जळगाव शहर भाजपचे सर्व नगरसेवक आदी उपस्थित होते.

Protected Content