मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. यात पाच जेसीबी व क्रेन्सच्या मदतीने पुष्पवर्षाव करण्यात आला.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यात विविध कार्यक्रम देखील साजरे करण्यात आले. यामध्ये कुऱ्हा जिल्हा परिषद गटातर्फे मोटरसायकल रॅली काढण्यात आली. मुक्ताईनगर प्रवर्तन चौकात 5 जेसीबी तसेच एका क्रेन द्वारे एक क्विंटलचा आहार अर्पण करून फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच प्रवर्तन चौकात एसटी डेपोच्या बाजूला डिजिटल बॅनर, लेझर शो देखील सायंकाळी सादर करण्यात येऊन फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जिल्हा परिषद गटात निमखेडी बुद्रुक येथे व कुऱ्हा येथे रोग निदान शिबिर तर वायला येथे लाडू तुला करण्यात येऊन संपूर्ण ग्राम भोजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता.
मुक्ताईनगर येथील आ. चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी रेड क्लब द्वारे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तसेच वरणगाव येथील शिवबा मित्र मंडळातर्फे देखील रोगनिदान शिबिर वरणगाव येथे घेण्यात आले. तसेच बोदवड येथील आत्म सन्मान फाउंडेशनच्या वतीने गतिमंदांना कपडे वाटप तसेच भोजन देण्यात आले. मुक्ताईनगर येथे उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले. नायगाव रुईखेडा येथे देखील रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते.
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गुलाबराव पाटील यांच्यामार्फत त्यांचे पुत्र प्रताप पाटील, पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील, जिल्हा शिवसेनाप्रमुख समाधान महाजन, जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष नंदकुमार महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख नवनीत पाटील, बारामतीचे करण खलाटे, अल्पसंख्यांक विभागाचे राज्य उपाध्यक्ष अफसर खान, युवा सेना जिल्हाप्रमुख पंकज राणे, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख शिवराज पाटील,शहर प्रमुख गणेश टोंगे,नगराध्यक्ष आनंदा पाटील, अजय पाटील, प्रमोद धामोडे, हितेश पाटील, गोलू मुऱ्हे ,रावेर तालुकाध्यक्ष वाय. व्ही. पाटील, स्वीय सहाय्यक प्रवीण चौधरी,माजी नगरसेवक संतोष मराठे, हेमराज पाटील, तुषार बोरसे, उज्वल बोरसे, दिवाकर भालेराव, दिलीप भालेराव, संदीप यादव, अजय केदारे, राहुल सपकाळे, सुरज मोरे, पंकज वाघ, सचिन पाटील, विजय भालेराव , सचिन पाटील, हेमराज पाटील, रुपेश पाटील यांच्यासह जिल्हाभरातील विविध पक्षांचे तथा संस्थांचे पदाधिकारी, नगरसेवक, शिवसेनेची महिला आघाडी, युवा आघाडी यासह मोठे पदाधिकारी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांच्यासह राज्य मंत्रीमंडळातील विविध मान्यवरांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना शुभेच्छा दिल्या.