वाढदिवस साजरा करणे भोवले; पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । कोरोना नियमांचे उल्लंघन करत वाढदिवस साजरा करणाऱ्या नागरीकांवर एमआयडीसी पोलीसांनी कारवाई करत २० ते २५ जणांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, कोरोना काळात सार्वजनिक कार्यक्रम साजरे करण्यास मनाई असतांना आयोध्यानगरातील हनुमान मंदीराजवळ अनिल लक्ष्मण घुले रा. रामेश्वर कॉलनी याचा वाढदिवस साजरा करण्यात आला. याची माहिती एमआयडीसी पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत अनिल घुलेसह सुनिल लक्ष्मण घुले रा. रामेश्वर कॉलनी, रूपेश सोनार रा. कांचन नगर, सोनुसिंग बावरी रा. तांबापूरा, दत्तु थोरवे रा. रामेश्वर कॉलनी, मयुर वाणी रा. रामेश्वर कॉलनी, संदीप उर्फ राधे शिरसाठ रा. रामेश्वर कॉलनी, सिकंदर पटेल रा. फातेमा नगर, पप्पु पांडोळकर रा. रामेश्वर कॉलनी, विक्की पाटील रा. अयोध्या नगर, अक्षय पाटील रा. अपना घर कॉल्नी, अयोध्या नगर, दिपक तरटे रा. नागसेन नगर यांच्यासह इतर १० ते १२ जणांवर कारवाई केली. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलीस कॉ. सतीश गर्जे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अतुल वंजारी करीत आहे. 

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.