Home Cities जामनेर पहूर येथे भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर, व संत तुकडोजी महाराज यांची जयंती...

पहूर येथे भगवान परशुराम, महात्मा बसवेश्वर, व संत तुकडोजी महाराज यांची जयंती साजरी

0
154

पहूर, ता. जामनेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत येथे महात्मा बसवेश्वर महाराज, भगवान परशुराम महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावात साजरी करण्यात आली. गावातील ग्रामस्थ, समाजबांधव आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सभापती बाबुराव घोंगडे होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पत्रकार मनोज जोशी, ज्येष्ठ पत्रकार शांताराम लाठे, अँड. संजय पाटील, माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे, पत्रकार रवींद्र लाठे यांनी महापुरुषांच्या विचारांवर आधारित मार्गदर्शन करत समाजाला एकात्मता, समता आणि बंधुभावाचा संदेश दिला.

या कार्यक्रमाला पहूर पेठचे सरपंच अफजल तडवी, उत्तर महाराष्ट्र धनगर समाज संघर्ष समितीचे प्रमुख रामेश्वर पाटील, उपसरपंच राजू जाधव, माजी उपसरपंच श्याम सावळे, तसेच रवींद्र मोरे, महेश पाटील, अमोल पाटील, शांताराम गोंधनखेडे, प्रदीप साखरे, गजानन कुयटे, गौरव लाठे, विजय माहोरे, मनोज कुयटे, मंगेश बेलपत्रे, कमलेश कुयटे, मनोज लाठे, शरद नरवडे आदींची उपस्थिती लक्षणीय होती.


Protected Content

Play sound