चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मोठे बोढरे शिवारातून एकाची ४० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आले आहे. याप्रकरणी जळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लखन कपूरचंद जाधव (वय-२५) रा. मोठे बोढरे ता. चाळीसगाव हा तरुण सोलर कंपनीत मजूरी म्हणून कामाला आहे. दरम्यान २३ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास बोढरे शिवारातील शेत गट नंबर २९० येथील लिंबाच्या झाडाखाली त्याची (एमएच १९, डीएच ९५२१) क्रमांकाची दुचाकी पार्क करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी झाडाखाली लावलेली दुचाकी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याबाबत लखन जाधव यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक संदीप माने करीत आहे.