Home क्राईम पाचोरा शहरातून मोटारसायकल चोरी

पाचोरा शहरातून मोटारसायकल चोरी

0
28

पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा येथुन स्टेट बँके समोरून एका इसमाची दुचाकी चोरी झाल्याने अज्ञात चोरट्या विरोधात पाचोरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, आर्थीक व्यवहार कामासाठी फिर्यादी प्रभाकर वामन पाटील राहणार गिरड ता. भडगाव हे त्यांचा मालकीची लाल रंगाची स्प्लेंडर क्र एम. एच . १९ ए.टी . – ७४४१ हे दुचाकी वाहन बॅकेच्या गेट समोर लावुन बॅकेत गेले होते. सुमारे अर्धा तासानंतर बँकींग काम आटपून दुचाकी वाहन लावलेल्या जागी आले असता त्यांना त्या ठिकाणी वाहन दिसले नाही.त्यामुळे प्रभाकर पाटील यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात चोंरट्या विरोधात कलम ३७९ नुसार गुन्हा नोंद करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound