भुसावळ प्रतिनिधी । शहरातील जामनेर रोडवरील गुलमोहर कॉलनीत दोन मोबाईलसह रोकड लांबविण्याची घटश्रा उघडकीस आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, देवेंद्र बाबुराव पाटील हे जामनेर रोडवरील गुलमोहर कॉलनीत राहतात. आज सकाळी त्यांच्या घरातून दोन मोबाईल हँडसेटसह पाच हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले. कुणीतरी अज्ञात चोरट्यांनी हा डल्ला मारल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे. याबाबत देवेंद्र बाबुराव पाटील यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.