जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून चोरीच्या दुचाकी आणून त्यांची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला. या टोळीकडून चोरीच्या १६ दुचाकी हस्तगत केल्या आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरात विविध पोलीस ठाण्याच्या अंतर्गत दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यांचा उलगडा करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी पथकाला दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसननजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक नेमून पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गोपनीय माहितीनुसार एरंडोल तालुक्यातील पिंप्री सिम येथील सुनील भिल यांच्याकडे चोरीची दुचाकी असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विश्वासात विचारपूस केले असता त्याने इतर चोरीच्या ३ दुचाकी काढून दिल्या. त्यानंतर ह्या दुचाकी एरंडोल तालुक्यातील नांगदुली या गावातील खुशाल पाटील व गोविंदा कोळी यांच्याकडून विना कागदपत्राच्या आधारे कमी किमतीत विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने खुशाल पाटील आणि गोविंदा कोळी यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अजून ९ मोटरसायकल हस्तगत केल्या, त्यानंतर सुनील भिल याची अजून चौकशी केली असता तपासात पाचोरा तालुक्यातील हर्षल पाटील (राजपूत) यांच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत केल्या. दरम्यान या सर्व दुचाकी संतोष इंगोले रा. अकोला याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून चोरून या चौघांकडे विल्हेवाट लावण्याचे काम दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चौघांना अटक केली. चौघांकउून ७ लाख ६० हजार रुपये किमतीच्या १६ दुचाकी हस्तगत केले आहे.
याप्रकरणी सुनिल शामराव भिल (वय-३५) रा. पिंप्री सिम ता. एरंडोल, खुशाल उर्फ भैय्या राजू पाटील (वय-२०), गोविंदा अभिमन्य कोळी (वय-४५) दोन्ही रा. नागदुली ता.एरंडोल आणि हर्षल विनोद कोळी (वय-२०) रा. मोहाडी ता. पाचोरा यांच्याविरोधात गुन्हा दााल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश राजपूत, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, गणेश चोबे, सहायक फौजदार अनिल जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीप सावळे, नंदलाल पाटील, महेश महाजन, जयंत चौधरी, अनिल चौधरी, प्रीतम पाटील, पोलीस नाईक भगवान पाटील, हेमंत पाटील, किरण चौधरी, ईश्वर पाटील, लोकेश माळी, गोरख बागुल, उमेश गोसावी, चालक पोलीस नाईक अशोक पाटील, मोतीलाल चौधरी, प्रमोद ठाकूर यांच्यासह इतरांनी कारवाई केली आहे.