Home क्राईम आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दुसरा गंभीर जखमी

आयशरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, दुसरा गंभीर जखमी

0
117

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | कानळदा गावाजवळील वडनगरी येथील महादेव मंदिराचे दर्शन घेऊन दुचाकीने घराकडे निघालेल्या दोन जणांना मागून येणाऱ्या डीजेच्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने ४५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी ५ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात दोन घेण्याचे काम सुरू होते. बाबू प्रल्हाद कोळी वय – ४५ रा धनोरा ता. चोपडा असे मयत प्रौढचे नाव आहे.

महादेव मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जळगाव तालुक्यातील बडे जटाधारी महादेव मंदिरात सोमवारी अनेक तालुक्यांमधून भाविक कावड यात्रा घेऊन, दर्शनाला आले होते. बाळू कोळी हे देखील त्यांचे मित्र पिंटू सुतार यांच्यासोबत दर्शनाला आले होते. दर्शन घेतल्यानंतर ते (एमएच १९,बीएन ८२६३) या दुचाकीने घरी जायला निघाले. मात्र, काही मंदिरापासून काही अंतर पार केल्यानंतर, डीजे लावलेल्या (एमएच ०४, एफजे २२६३) आयशरने बाळू कोळी यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत बाळू कोळी व पिंटू सुतार हे दुचाकीवरुन कोसळले, त्यात बाळू कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर पिंटू कासार हे जखमी झाले. या अपघातानंतर इतर भाविकांनी तातडीने जखमीला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.


Protected Content

Play sound