Home धर्म-समाज भुसावळात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

भुसावळात शिवजयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली ( व्हिडीओ )

0
42

भुसावळ प्रतिनिधी । आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असून यानिमित्त शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली.

शहरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अनुषंगाने भाजपतर्फे भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात खासदार रक्षाताई खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, प्रा. सुनील नेवे, भुसावळ विधानसभा विस्तारक दिनेश नेमाडे, भुसावळ शहराध्यक्ष पुरुषोत्तम नारखेडे, भुसावळ न.पा. शिक्षण समिती सभापती मंगला आवटे, जि.प. सदस्या पल्लवी सावकारे, प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्ष रजनी सावकारे, कॉटन सेल संचालक प्रमोद सावकारे, नगरसेवक मुकेश गुंजाळ, नगरसेविका सविता अहिरे, नगरसेवक पिंटू कोठारी, शंभूराजे ग्रुप संस्थापक अध्यक्ष राजेंद्र दत्तू आवटे, सौ विनिता सुनील नेवे, देवा वाणी, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सुमित बर्‍हाटे, भुसावळ भाजयुमो शहराध्यक्ष अनिकेत पाटील, गौरव आवटे, हिमांशू दुसाने यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

गडकरी नगरापासून रॅलीस प्रारंभ झाला. यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना वंदन केल्यानंतर बाजारातून रॅली नाहाटा कॉलेजपर्यंत काढण्यात आली. यानंतर पुन्हा जामनेर रोडमार्गे रेल्वे स्थानकाबाहेरच्या भव्य पुतळ्याजवळ याची सांगता करण्यात आली. रॅलीच्या दरम्यान देण्यात आलेल्या विविध घोषणांनी परिसर दणाणून निघाला.

पहा : मोटारसायकल रॅलीबाबतचा हा व्हिडीओ.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound