‘या’ राज्यात मोठा राजकीय भुकंप; भाजपच्या मुख्यमंत्र्यांचा मंत्रिमंडळासह राजीनामा

चंदीगड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । हरियाणा राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. येथील भाजपचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हरियाणा राज्यात भाजप आणि जननायक जनता पक्षात (जेजेपी) आघाडी तुटली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या जागा वाटपाच्या मुद्दावरून ही आघाडी तुटली असे सुत्र प्राप्त झाले आहे. मुख्यमंत्री सोबतच संपूर्ण मंत्रिमंडळाने सुध्दा राजीनामा दिला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, आज दुपारी पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री शपथ घेईल, संजय भाटिया हे नवे मुख्यमंत्री असतील तर नायब सैनी हे उपमुख्यमंत्री असतील. संजय भाटिया करनालमधून खासदार आहेत. मनोहरलाल खट्टर यांना करनालमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. जननायक जनता पक्षाचे आमदार भाजपमध्ये जाऊ शकतात. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची अपक्ष आमदारांसोबत त्यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. भाजपला जननायक जनता पक्षाची आवश्यकता नाही आहे, ते त्याशिवाय सरकार स्थापन करू शकतात. भाजपला जननायक जनता पक्षापासून वेगळं व्हायचं होत पण त्यांचे प्रमुख दुष्यंत चौटाला तयार नव्हते.

हरियाणाची विधानसभा ९० जागांची आहे. २०१९ च्या निधानसभा निवडणुकीत भाजपकडे ४१ आमदार होते. काँग्रेसच्या आमदारांची संख्या ३० होती, तर जेजेपीच्या आमदारांची संख्या १० आहे. अपक्ष आमदारांची संख्या ७ तर हरियाणा लोकहित पक्षाकडे एक जागा आहे. सत्ता स्थापनेसाठी ४६ जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे भाजपाला आता फक्त ५ आमदारांची गरज आहे ती गरज ते अपक्ष आमदारांच्या मदतीने पूर्ण करू शकतात

Protected Content