मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर खासदार चिरंजीव ! : विरोधक आक्रमक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | खासदार श्रीकांत शिंदे हे चक्क मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेले असल्याचा फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळातील वातावरण तापले आहे. यावरून विरोधकांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी आज खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटा ट्विट केला आहे. यात ते चक्क आपले वडील एकना शिंदे यांच्या अर्थात मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसून अधिकार्‍यांशी चर्चा करत असल्याचे दिसून येत आहे.

हा फोटो ट्विट करत त्यांनी म्हटलं आहे की, ‘खा.श्रीकांत शिंदे यांना सुपर सीएम झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्री पदाचा कारभार सांभाळतात. लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरूये. हा कोणता राजधर्म आहे? असा कसा हा धर्मवीर?’ अशी टीका वरपे यांनी केली आहे.

याआधीच एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार काम करत असल्याची टीका करण्यात येते. यातच आता थेट त्यांचे चिरंजीव मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

Protected Content