यावल महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र मंडळाचे उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा.पी.एस.पाटील उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य ए.पी.पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा.डॉ. सुधा खराटे यांनी करून दिला. प्रमुख पाहुणे प्रा .पी.एस.पाटील यांनी दीपप्रज्वलन करून मंडळाचे उद्घाटन केले. शेअर मार्केट या विषयावर त्यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केली यावेळी मार्गदर्शनपर बोलतांना पाटील म्हणाले शेअर मार्केट आर्थिक निर्देशांक आहे.

पैसे गुंतवणुकीचा व कमवण्याचा योग्य मार्ग आहे. शेअर मार्केट मध्ये सिलेक्शन व संयम या दोन गोष्टींना खूप महत्त्व आहे. अध्यक्षीय भाषणात प्रा. ए.पी .पाटील यांनी विचार व्यक्त केले की पैसा केवळ बचत करण्या पेक्षा त्याची गुंतवणूक करून पुन्हा नव्याने पैसा कमविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी शेअर मार्केट प्रमुख क्षेत्र आहे. सदर कार्यक्रम प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची पाटील हिने केले तर उपस्थितांचे आभार तेजश्री कोलते हिने मानले. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी चेतन बारी, नरेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमास डॉ. अनिल पाटील,सुभाष कामडी , वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाचे बहुसंख्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रशेखर कोळी, दीपक नेवे, प्रमोद भोईटे यांनी सहकार्य केले.

Protected Content