जळगाव-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । जळगावसह पुणे जिल्ह्यातून दुचाकी चोरी करणाऱ्या दोन संशयित आरोपींना छत्रपती संभाजी नगरातून रामानंद नगर पोलीसांनी पर्दाफाश करीत मुसक्या आवळल्या. त्याच्यांकडून दहा दुचाकी हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शहरात वाढत्या दुचाकी चोरी रोखण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी दिल्या आहे. तसेच शहरातील आदर्श नगरातून दि. ४ एप्रिल रोजी धनंजय सुभाष परदेशी यांची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली होती. रदुचाकी चोरतांना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाकडन्ूा दुचाकी चोरट्यांचा शोध सुरु होता. रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांना संशयित हे छत्रपती संभाजी नगर येथील असल्याची माहिती मिळाली. त्यांनी लागलीच गुन्हे शोध पथकाला त्याठिकाणी पाठवले. या पथकाने दिलीप रामदास राठोड (वय ३०) याला ताब्यात घेतले. त्याला खाक्या दाखविताच त्याने चोरलेल्या आठ दुचाकी काढून दिल्या. तसेच त्याचा साथीदार अनिल चंडौल याला देखील पथकाने ताब्यात घेतले त्याच्याकडून दोन अशा एकूण दहा दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहे. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींपैकी ३ दुचाकी रामानंद नगर तर ३ दुचाकी जिल्हापेठ, १ दुचाकी शहर पोलीस ठाणे तर एक दुचाकी ही पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथून चोरी के ली असून अन्य दोन दुचाकींचा पोलिसांकडू तपास के ला जात आहे. रामानंद नगर पोलिसांनी दुचाकी चोरट्यांकडून दहा दुचाकी हस्तगत केल्यामुळे पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यातील अंमलदार पोहेकॉ जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी यांच्यासह गुन्हे शोध पथकाला रिवॉर्ड दिला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्र्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ संजय सपकाळे, जितेंद्र राजपुत, सुशिल चौधरी, इरफान मलिक, पोना रेवानंद साळुंखे, विनोद सुर्यवंशी, अतुल चौधरी, हेमंत कळसकर, रविंद्र चौधरी, उमेश पवार, जुलालसिंग परदेशी, मनोज मराठे, दीपक वंजारी, निलेश बच्छाव यांच्या पथकाने केली.