मुंबई – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेनेतील वर्चस्वाच्या लढाईत कुणाचा विजय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असतांनाच आता ही सुनावणी ८ ऑगस्ट नव्हे तर लांबणीवर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
एबीपी-माझा या वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार सत्तासंघर्षाबाबत ८ ऑगस्ट रोजीची सुनावणी ही १२ ऑगस्ट अथवा त्यापेक्षाही विलंबाने होऊ शकते. यात म्हटले आहे की, सुप्रीम कोर्टात सुरु असलेली महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी लांबणीवर पडली आहे. सोमवारी होणारी सुनावणी आता पुढे ढकलण्यात आली आहे. ही सुनावणीसाठी पुढची संभाव्य तारीख १२ ऑगस्ट ही देण्यात आली आहे. दरम्यान, सरन्यायाधिश रामण्णा हे २६ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. यामुळे ही सुनावणी अजून पुढे जाऊ शकते.
त्यातच १२ ऑगस्ट हा शुक्रवार त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या काही सलग सुट्ट्या त्यामुळे सुनावणीत आणखी काही काळ जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तातडीच्या सुनावणीसाठी उद्धव ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडे पुन्हा विनंती करावी लागणार असली तरी ती मान्य होईल का ? याबाबत साशंकता आहे.