मोठी बातमी : बंद घरात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ  शहरातील चॉदमारी चाळ परिसरात राहणाऱ्या तरूणाचा राहत्या घरात मयतस्थितीत कुजेलला मृतदेह आढळून आल्याची घटना शुक्रवारी दुपारी आढळून आला आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अजय बाबुराव सोनवणे वय-३५ रा. चांदमारी चाळ, भुसावळ असे मयत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अजय बाबुराव सोनवणे हा तरूण आपल्या कुटुंबासह चांदमारी चाळ येथे एकटाच वस्तव्याला होता. अजय हा आपल्या घरात गेल्या ४ ते ५ दिवसांपासून घरीच होता. दरम्यान शुक्रवारी २ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता शेजारी राहणाऱ्यांना घरातून वास येत असल्याचे लक्षात आले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर पोलीसांना माहिती देण्यात आली. घराचा दरवाजा उघडताच त्याचा मयतस्थितीत मृतदेह कुजलेल्या स्थितीत आढळून आला. त्याच्या कोणत्या कारणामुळे मृत्यू झाला हे समोर आलेले नाही. याबाबत भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अनिल चौधरी हे करीत आहे.

Protected Content