जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील सुप्रीम कॉलनी परिसरात गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कारवाई करत अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि एक एअर गन जप्त केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभम अनंता राउत वय- २१, रा. भगवा चौक सुप्रिम कॉलनी असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
अधिक माहिती अशी की, शुभम राऊत हा सुप्रीम कॉलनी परिसरात अग्निशास्त्र घेऊन फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पो.नि. संदीप पाटील यांना मिळाली, त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलीस स्टेशनचे पोउनि चंद्रकांत धनके, पोकाँ छगन तायडे, गणेश ठाकरे, शिद्धेश्वर डापकर यांनी सोमवारी २३ डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता कारवाई करत शुभम राऊत याला अटक केली.
त्याच्याकडून गावठी कट्टयासारखे दिसनारी एअर गन मिळुन आली. सदर ईसमास विश्वासात घेवुन चौकशी करता त्याने माहीती दिली की, त्याचा मित्र नामे बंटी तायडे रा. तायडे गल्ली जळगांव याच्याकडे एक पिस्टल दिलेली आहे. बंटी तायडे चा लागलीच शोध घेतला असता तो घरी मिळुन आला नाही. त्याच्या घराची घरझडती घेता त्याचे घरातून एक गावठी पिस्तूल जप्त केली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि चद्रकांत धनके सोबत पोकाँ योगेश घुगे हे करीत आहे.