मोठी बातमी : ट्रकच्या भीषण आपघातात एकठार; दोन जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दोन ट्रकची समोरासमोर भीषण अपघात होवून एकजण जागीच ठार झाला तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास फेकरी फाटानजीक घडली आहे. दरम्यान या अपघातामुळे वाहतूकीची मोठी कोंडी झाल्याचे पहायला मिळाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील फेकरी फाटाजवळ ट्रक क्रमांक (डब्ल्यूबी ११ ई ५६८६) आणि दुसरा ट्रक यांचा समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात एका ट्रकवरील चालकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी २५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान हा अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमींना बाहेर काढण्यात मदत केली. या अपघातमुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक दोन ते तीन किलोमीटरपर्यंत खोळंबली होती.

अपघात झाल्याची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. या भीषण अपघातात दोन्ही वाहनांचा चुराडा झाला आहे. या ठिकाणी महामार्गाने वळणासाठी रस्ता केलेला आहे यात चूक झाल्याने हे दोन्ही ट्रक समोरासमोर येऊन धडकले. या अपघाताला महामार्ग जबाबदार असल्याचे स्थानिकांनी सांगितले. यापूर्वी देखील याच कारणामुळे या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत, हा एवढाच रस्ता महामार्गाने अपूर्ण सोडल्यामुळे वाहन चालकांची या ठिकाणी गफलत होते. असे स्थानिक नागरीकांकडून बोलले जात आहे.

Protected Content